VotingRound3 : ऑनलाईन पैसे वाटप करणाऱ्या २ महिला ताब्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यात कोल्हापूर मतदार संघाचा देखील समावेश आहे. मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. नागरिक मतदानाचा हक्क बजावत होते. मात्र मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचे आमिष दाखविले जात असल्याचा प्रकार कोल्हापुरात उघड झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील कदमवाडी परिसरातील एका मतदान केंद्राच्या परिसरात पेटीएम या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पैसे वाटप करीत होत्या. ही बाब निर्दर्शनास आल्यानंतर या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात येत आहे.

कोल्हापुरात कोण मारणार बाजी ?

कोल्हापुरात राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक तर शिवसेना-भाजप महायुतिकडून प्रा. संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूर मतदारसंघ हा राष्ट्रीवादीचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. पण यंदाच्या वर्षी भाजप-सेना महायुती कोल्हापूरची जागा घेणार की खासदारकीच्या खुर्चीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा उमेदवार बसणार हे येणारा काळच ठरवेल. मात्र महाडिक आणि मंडलिक यांच्यात मोठी चुरस रंगणार असल्याच्या चर्चा आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like