पुण्यामध्ये साडी वाटण्याच्या बहाण्याने दोन महिलांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना साडी वाटण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पुण्यात घडलेली ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e27bff63-c1ad-11e8-9d60-bf4603ff3171′]

कोथरुड परिसारात लॉटरी लागल्याच्या बहाण्याने गरीबांना पैसे आणि साडी वाटप करण्यात येत असल्याचे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) दुपारी एकच्या सुमारास राजदीप बिल्डिंग जवळ घडली. फिर्यादी महिलेजवळ एक व्यक्ती आला आणि गोव्यात २५ लाख रुपयांची लॉट्री लागल्याचे सांगितले. त्यामुळे गरिबांना पैसे आणि साडी वापट करण्यात येत असल्याचे सांगून मंगळसूत्र पिशवीत ठेवण्यास सांगितले. मंगळसुत्र पिशवीमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने चोरट्याने महिलेचे २५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हातचलाखीने चोरुन नेले. काही वेळाने महिलेने पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये दगड ठेऊन चोरट्याने मंगळसुत्राची चोरी केल्याचे समजले.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9abe6c4-c1ad-11e8-bb68-e90692c4f69e’]

शिवाजीनगर परिसरात देखील एका ३९ वर्षीय महिलेला एका ५० ते ५५ वर्षीय अज्ञात व्यक्तीने साडी देण्याच्या बहाण्याने फसवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जया कसबे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जया कसबे या मंगळवार (दि. २५) दुपारी साडेतीनच्या सुमरास भैय्यावाडी चाळी समोरील रोडवरुन जात होत्या. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन गरीबांना साडी आणि पैसे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. या महिलेला बोलण्यात गुंतवून तिला मंगळसुत्र शंभराच्या नोटेत ठेवण्यास सांगितले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू जया कसबे यांनी मंगळसुत्र काढून नोटेवर ठेवले. ही नोट पीशवीत ठेवण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने हातचलाखीने ६२ हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरुन नेले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी