गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन – चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड परिसरातील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड परिसरामध्ये घरात एलपीजी गॅसच्या भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात लक्ष्मी विलास धोतरे (वय-३५) आणि संगीता गणेश पवार (वय २७) अशी जखमींची नावं आहेत.
Gas-Leak2
मिळालेल्या माहितीनुसार, एका मृत व्यक्तीच्या सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता, त्यासाठीचा स्वयंपाक बनवण्यात महिला व्यस्त असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. जखमी महिलांना उपचारासांठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दखल करण्यात आले.
Gas-Leak
अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र, आग लागलेल्या ठिकाणी पोहचण्यास व्यत्यय आला. चिंचोळ्या रस्तामुळे आणि रस्त्यावर इलेट्रिकल पोलवरील वायर मोठ्या प्रमाणात लोंबकळत होत्या. त्यामुळे अग्निशमक दलाच्या गाड्यांना आणि जवानांना घटनास्थळी पोहण्यासाठी कसरत करावी लागली.
GAs-Leak-3

आरोग्यविषयक वृत्त

You might also like