धक्कादायक ! डॉ. सुदाम मुंडे हॉस्पिटलमधून 2 महिलांचे गर्भ गायब

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी शहराजवळ बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू करून गर्भपात आणि कोरोना प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारीवरून सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलवर बीड जिल्हा प्रशासन मोठी कारवाई केली होती. त्यानुसार मुंडेने हॉस्पिटलमध्ये तपासलेल्या तीन महिलांपैकी दोघींचे गर्भ गायब असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोग्य विभागाने चौकशी केली असता खळबळजनक सत्य उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे दोन्ही महिलांची गर्भपाताची कारण वेगवेगळी सांगितली आहेत. या विषयी आरोग्य विभागाला संशय आला असल्याची माहिती असून पुढील तपास सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सांगितले आहे. पोलिसांनी याआधी रुग्णालयावर कारवाई केली होती. त्यावेळ अटक करणार्‍या अधिकार्‍यांना अरेरावीची भाषा करत मुजोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

देशभरात गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे याने बेकायदेशीरपणे हॉस्पिटल सुरु करत स्वत: प्रॅक्टिस करत होता. त्यानुसार आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री मुंडेच्या बेकायदेशीर हॉस्पिटलवर छापा मारला होता. यावेळी गर्भपात आणि कोरोना संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडली. तसेच या दवाखान्यात कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार सुरु होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली होती.