छत्री वाटपाच्या कार्यक्रमातच भाजपच्या ‘त्या’ दोघींची ‘फ्री स्टाईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्री वाटपाच्या कार्यक्रमातच भाजपच्या माजी महापौर व विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यामध्ये ‘ फ्री स्टाईल ‘ झाल्याचा प्रकार मीरारोड येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, माजी महापौर आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छूक असलेल्या गीता जैन यांच्या हस्ते छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र माजी महापौरांच्या या कार्यक्रमात भाजपच्याच नगरसेविका आणि तिच्या पतीने राडा केला.त्यात माजी महापौर आणि नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. स्थानिक भाजप नगरसेविका रुपाली मोदी आणि त्यांच्या पतीने राडा घातल्याने चांगलाच गोंधळ उडाला. एकमेकींना जोरजोराने बोलताना दोघींनाही राग अनावर झाल्याने त्या एकमेकीच्या अंगावर धावून गेल्या.

उपस्थितांनी हस्तक्षेप करत दोघींना बाजूला केले. परंतु, दोघींचे शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले होते. रुपाली मोदी आमदार मेहता समर्थक आहे. मेहता आणि गीता जैन यांच्यातील असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या फ्री स्टाईलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी