दोन महिलांनी पतीला घटस्फोट देऊन केलं एकमेकींशीच लग्न

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टाने कलम 377 बाबद दिलेल्या निर्णयानंतर अनेक समलैंगिकतेचे प्रकरने समोर येत आहेत. उत्तरप्रदेश मधील हमीरपूर येथे नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. मुलगा मुलीच्या प्रेमात पडणे अथवा मुलगी मुलाच्या प्रेमात पडणे स्वाभाविक आहे. हमीर पूर येथील प्रकरण तर त्या पलीकडचे आहे येथे तर चक्क दोन महिला एकमेकांच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की, दोघींनी आपल्या पतीला घटस्फोट देऊन एकमेकांसोबतच लग्न केले आहे.

अशी आहे लग्नाची कथा…
या दोन्ही युवती 7 वर्षांपूर्वी गावातच भेटल्या होत्या. त्यानंतर ओळख वाढली दोघींमध्ये मैत्री झाली. आणि आता तर त्यांच्या या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आहे. कालांतराने दोघींचाही विवाह वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याने दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला. दुराव्यामुळे त्यांची भेट देखील होत नव्हती त्यांचे सासरी मन न रमल्यामुळे त्यांनी आपल्या पतींना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि आता एकमेकींशीच लग्न केले आहे.

लग्न करताना एकमेकींना दिले हे वचन..
१. दोघी आपापल्या मर्जीने नोकरी करतील याबाबत दोघींपैकी कोणालाही कुठलीच हरकत नसावी.

२. एकमेकांशिवाय दोघी कोणत्याही परपुरुषासोबत शारिरीक संबंध ठेवणार नाहीत.
३. दोघीही मुल जन्माला घालण्याबाबद इच्छा व्यक्त करणार नाही.
असे एकूण सात वचन त्यांनी एकमेकांना दिले तर या वचनांची पूर्तता दोघींकडून केली जाईल असे शपथपत्र देखील या दोघींनि या वेळी दिले.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,राठ या गावातील रहिवासी अभिलाषाने आणि कधौली येथे राहणाऱ्या दीपशिखा यांनी आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि एकमेकींशी विवाह केला.अभिलाषाला पती तर दीपशिखाला पत्नी मानत दोघिंनी मंदिरात जावून लग्न केले. दोन्ही महिलांचे वय 21 वर्ष असून एक महिला एका मुलाची आई आहे.

या कारणांमुळे रजिस्ट्रार ने दिला होता विवाह नोंदणीस नकार…
माध्यमांच्या अहवालांनुसार दोन्ही महिला विवाहनोंदणी कार्यालयात त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यासाठी गेल्या. त्यांनी तेथे एकमेकांना दिलेल्या वचनांचे एक शपथपत्र दिेले. सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाला समाज मान्यता देण्याबाबतचा आदेश विभागाकडे आला नसल्यामुळे त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येणार नसल्याचे रजिस्ट्रारने सांगितले. आणि विवाह नोंदणीस नकार दिला.