2 वर्षापुर्वीच डिलिट केलेल्या पोस्टमुळं सामाजिक कार्यकर्तीविरुद्ध FIR

गोहाटी : वृत्तसंस्था – तणावातून तुम्ही एखादी पोस्ट फेसबुकवर टाकली. मात्र, काही वेळाने तुमच्या लक्षात स्वत:ची चुक आली व तुम्ही ती डिलिट केली. या घटनेनंतर तब्बल २ वर्षांनी त्या डिलिट केलेल्या पोस्टवरुन लोकांची मने कलुषित होण्याची शक्यता आहे का? नाही ना. तरीही आसाम पोलिसांनी अशाच डिलिट केलेल्या दोन वर्षापूर्वीच्या पोस्टबद्दल एका सामाजिक कार्यकर्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भारत -पाकिस्तान यांच्यातील जुन २०१७ मधील सामन्यात विराट कोहली हा शुन्यावर बाद झाला. हताश झालेल्या तिने एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर केली. काही वेळाने तिला त्याची जाणीव झाल्यावर तिने ती पोस्ट डिलिटही केली. या डिलिट केलेल्या पोस्टवरुन आता पाकिस्तानचे समर्थन आणि बीफ खाण्याविषयी बोलले असल्याने लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आता पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोहाटी विद्यापीठातील एक स्कॉलर रेहाना सुल्ताना या सर्व प्रकारामुळे अडचणीत आली आहे. आपण ही पोस्ट केल्याचे तिने मान्य केले आहे. मात्र, त्यानंतर काही वेळातच ही पोस्ट डिलिट केली होती. यापूर्वी रेहाना सुल्ताना हिच्या विरुद्ध एन आर सीवर टिका करणारी कविता शेअर केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला आहे.

रेहाना सुल्ताना हिने सांगितले की, एन आर सी सूचीत वास्तविक असलेल्या नागरिकांचा समावेश व्हावा, यासाठी आपण काम करीत आहोत. नागरिकांच्या सुनावणी दरम्यान त्यांना आपण मदत करतो. या कारणावरुनच दोन वर्षापूर्वी डिलिट केलेल्या पोस्टवरुन त्यांनी एका वेबसाईटचा आधार घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या वेळी विराट कोहली शुन्यावर बाद झाल्यावर पाकिस्तानात झालेल्या जल्लोषाचे तिने समर्थन केले होतो व बीफ खात असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like