‘त्या’ दोघींनी केला ‘तिला’ संपवण्याचा ‘प्लॅन’, चक्क व्यसनमुक्ती केंद्रातच ‘ओढणी’नं केला खून

कल्याण :  पोलीसनामा ऑनलाइन – व्यसनमुक्ती केंद्रातून सुटका करून घेण्यासाठी एका तरुणीची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किशोरी सावंत असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रातील दोन तरुणींनीच किशोरीचा गळा ओढणीने आवळून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

इशा पांडे आणि विशाखा कोटावे अशी आरोपी तरुणींची नावे आहेत. या दोघीही इशा सोबत सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्रात मागील काही दिवसांपासून उपचार घेत होत्या. किशोरीमुळे आपल्याला डिसचार्ज मिळत नसल्याचा समज इशा आणि विशाखाचा होता. दोघीनींही किशोरीला मारण्याचा प्लॅन केला. यासाठी किशोरीच्या जेवणात उवा मारण्याचे औषध टाकण्यात आले. त्यामुळे किशोरीला गुंगी आली आणि त्याचाच फायदा घेऊन दोघीनी किशोरीचा ओढणीने गळा आवळला.

कोणालाही याबाबत काहीही संशय येऊ नहे यासाठी इशा आणि विशाखाने ही घटना आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. टिटवाळ्याजवळच्या रायते गावात दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्रात ही घटना घडली आहे.यानंतर टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

अशी दिली गुन्ह्याची कबुली
किशोरीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोस्टमार्टमधे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. किशोरी इशा आणि विशाखा सोबत असल्यामुळे पोलिसांनी दोघीनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला असता दोनीही आरोपींनि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर दोघीना अटक करून पोलिसांनी या संधर्भात दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com