अहमदनगर : गणेश विसर्जनावेळी पाण्यात पडून 2 युवकांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे प्रवरा नदीपात्रात व शेवगाव येथील ढोरा नदीपात्रात या घटना घडल्या.

याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सौरभ विठ्ठल कर्डिले (वय 18) हा इयत्ता बारावीत शिकणारा मुलगा गणेश विसर्जनासाठी येथील प्रवरा नदीपात्रात उतरला होता. पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला.

ही घटना काल रात्री साडेसात वाजता घडली. त्याच्यासोबतच्या तरुणांनी आरडाओरड केली असता
स्थानिक युवकांनी नदीत उडी घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने रात्री
उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. घटनास्थळी डीवायएसपी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आदींनी भेट दिली.

दुसरी घटना शेवगाव येथील ढोरा नदीपात्रात घडली. अनिल विलास वाल्हेकर (वय 20, रा. शेवगाव) हा घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ढोरा नदीपात्रात गेला होता. त्यावेळी पाण्यात बुडून वाल्हेकर याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like