Tyk Tyk – Quarter Bar & Kitchen in Kharadi Pune | खराडी येथील ‘टीकटीक’ आणि ‘क्वार्टर’ या रुफटॉप हॉटेल्सचे बांधकाम पाडले; महापालिकेचा बांधकाम विभागाने सुरू केली हॉटेल्स, पब आणि रेस्टॉरंटचे सर्वेक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Tyk Tyk – Quarter Bar & Kitchen in Kharadi Pune | खराडी येथील इमारतींमधील हॉटेल टीकटीक (Tyk Tyk Kharadi) आणि हॉटेल क्वार्टर (Quarter Bar & Kitchen in Kharadi) या दोन रुफटॉप हॉटेल्सवर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने आज कारवाई करण्यात आली (PMC Action On Rooftop Hotel In Kharadi) . या दोन्ही हॉटेल्सवर यापुर्वी दोन वेळा कारवाई केल्यानंतरही त्यापैकी एक हॉटेल सुरू होते. तसेच दुसर्‍या हॉटेलचा सेटअप पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने तसाच ठेवण्यात आला होता. दोन वेळा कारवाई केल्यानंतरही पुन्हा हॉटेल सुरू करण्यात आल्याने या दोन्ही हॉटेल्स मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.(Tyk Tyk – Quarter Bar & Kitchen in Kharadi Pune)

बेकायदेशीरपणे चालविल्या जाणार्‍या रुफटॉप आणि साईड मार्जिन मधील रेस्टॉरंट, बार , पबचे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सर्व्हेक्षण सुरू केले आहे. तसेच मिळकत कर विभागामार्फतही जागेत बदलासंदर्भातील पडताळणी करण्यात येणार आहे.

कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर (Kalyani Nagar Accident) आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल ( रेस्टॉरंट ) आणि पबच्या बांधकामाची पाहणी केली. या ठिकाणी मंजुर नकाशात कोणताही बदल केला नसल्याची माहीती पुढे आली आहे. दोन जणांच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेला बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने ज्या रेस्टॉरंट, पब मध्ये दारु पिली होती. अशा या दोन्ही ठिकाणाची पाहणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी केली. या ठिकाणी मुळ नकाशाप्रमाणेच बांधकाम असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे रुफटॉप आणि साईड मार्जिनमध्ये चालविल्या जाणार्‍या रेस्टॉरंट, हॉटेल यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागाकडून सातत्याने अशा ठिकाणी कारवाई केली जाते. परंतु मालकाकडून पुन्हा त्याठिकाणी शेड उभारून व्यवसाय सुरु केला जातो. सर्वेक्षण करून पुन्हा एकदा नोटीस दिली जाणार आहे, अनधिकृत बांधकाम उतरविले जाणार आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहीती शहर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांनी दिली. Pune Municipal Corporation (PMC)

  • संबंधित विभागांना माहीती कळविणार

महापालिकेकडून रेस्टॉरंट, हॉटेल व्यवसायाला परवानगी दिली जात नाही. या व्यवसायाला परवानगी दिली जाणार्‍या अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क, पोलिस यांना बेकायदेशीर बांधकाम असलेल्या ठिकाणी परवाना दिला जाऊ नये असे पत्र दिले जाणार आहे. त्याबाबतची माहीती कळविली जाणार आहे. यामुळे बंाधकाम विभागाच्या कारवाईनंतर पुन्हा तेथे व्यवसाय सुरु करण्यास प्रतिबंध लागु शकतो, असेही व वाघमारे यांनी नमूद केले.

  • जागेतील वापराची होणार पुन्हा तपासणी

मिळकत कर विभागाकडूनही रुफटॉप, साईड मार्जिनमध्ये चालविल्या जाणार्‍या हॉटेल, रेस्टॉरंट आदी व्यवसाय चालविल्या जाणार्‍या मिळकतींची माहीती गोळा केली जाणार आहे. जागेच्या वापरात बदल केलेला आढळून आल्यास संबंधितांकडून तिप्पट दंड वसुल केला जाईल असे मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Kalyani Nagar Pune Accident | ‘कुणालाही पाठीशी घालू नका’ पुणे हिट अँड रन प्रकरणात CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | व्हायरल व्हिडिओवर पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले यातून मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट, पण… (Video)

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघात प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ आला समोर, काय आहे व्हिडीओत? (Video)

Shrirang Barne On Ajit Pawar NCP | श्रीरंग बारणेंची नाराजी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, माझे काम केले नाही, अजितदादांना यादी… (Video)