पुणे : तरुणीचा TikTok व्हिडीओ एडीट करून बनवलं अश्लील गाणं, धमकी देणाऱ्या 5 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणीने टाकलेला टिक टॉक व्हिडिओ एडिट करुन त्यास अश्लिल गाणे एडिटिंग करुन अपलोड करणाऱ्या तरुणासह पाच जणांविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय साहेबराव म्हसे (रा. पवार नगर, सांगवी), गोविंद पाटील (रा. हिंगोली) सत्यवान झांजे (रा. कात्रज), रोहन कणसे आणि सुरज जाधव (रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

सध्या तरुणाईमध्ये टिक टॉकची मोठी क्रेझ आहे. अनेक जण आपल्यातील नृत्य, गायन तसेच इतर कला दाखविण्यासाठी व्हिडिओ तयार करुन तो टिक टॉक अ‍ॅपवर टाकत असतात. मात्र, अक्षय म्हसे याने या व्हिडिओचा गैरवापर करुन त्यात एडिग करणे, त्याला उत्तर देताना अश्लिल कॅमेट करणे, त्याच्या व्हॉटसअ‍ॅप नंबरवर शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार सुरु केले. हा प्रकार १ जुलैपासून सुरु होता. शेवटी एका ४० वर्षाच्या महिलेने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेने टिक टॉक अ‍ॅपवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावर अक्षय याने अश्लिल कॉमेट केली. फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप वरील नंबरवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या ओळखीच्या इतर चार जणांना फिर्यादी यांचा मोबाईल नंबर दिला. त्यांना अश्लिल मेसेज व धमकी देण्यास सांगितले.

सातारा जिल्ह्यातील एका २० वर्षाच्या तरुणीने टिक टॉक अ‍ॅपवर आपला व्हिडिओ टाकला होता. अक्षय याने बनावट नावाने अकाऊंट तयार करुन या तरुणीचा व्हिडिओ एडिट केला. त्यात अश्लिल गाणे एडिटिंग करुन त्या तरुणीचा व्हिडिओ म्हणून तो टिक टॉक अ‍ॅपवर अपलोड करुन व्हायरल केला.

तसेच वाकड येथील २९ वर्षाच्या महिलेने अक्षय म्हसे याच्या व्हिडिओवर कॅमेट केली होती. त्यावर त्याने तुझा पत्ता सापडला आहे. माझी पूर्ण टीम छत्रपती ही घेऊन लवकरच तुझ्या घरी येणार आहे, अशी धमकी दिली. तसेच गोविंद पाटील याने त्याचा टिक टॉक आयडीवरुन जीवे मारण्याची धमकी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – 

‘ब्लॅक कॉफी’ घेता ? वेळीच व्हा सावध ; रिसर्चमधील ‘हे’ 5 धक्कादायक खुलासे !

सतत वजन कमी-जास्त होणे आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 3 तथ्य

थंडीत हृदयरोगाच्या रुग्णांनी ‘या’ 4 गोष्टींची घ्यावी खास काळजी !

नारळ पाण्याने वेगाने वजन होईल कमी ! जाणून घ्या 11 फायदे

‘युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ झाल्यास ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी !