Typhoid and Covid-19 : टायफाईडला कोरोनाची लक्षणं समजू नका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. साधा ताप, सर्दी, खोकलाही झाला तर लोकं चांगलीच घाबरतात. लगेचच त्याला कोरोनाची लक्षणे समजतात. पण प्रत्येकवेळी सगळी लक्षणे म्हणजे कोरोनाच असे समजू नये. काहीवेळा इतरही काही आजार असू शकतात. त्यामुळे योग्यवेळी निदान करून त्यावर उपचार करून घेणे हेच महत्त्वाचे ठरते.

सध्या उन्हाळ्यात टायफाईडचा आजार जास्त उद्भवू शकतो. टायफाईडचा ताप पचनसंस्था आणि बॅक्टिरियाच्या इन्फेक्शनच्या कारणामुळे होत असतो. या टायफाईडचे अनेक लक्षणे कोरोनाशी मिळते-जुळते आहेत. टायफाईड हा घाणी, दुर्गंधीमुळे होतो. आता जाणून घेऊ लक्षणे आणि बचावाचे उपाय…

टायफाईडची लक्षणे काय?

–  रुग्णाला अशक्तपणा जाणवतो

–  संक्रमण वाढल्याने भूक कमी लागते

–  डोकेदुखी, अंगदुखी होते.

–  थंडी ताप येतो

–  पचनसंस्था बिघडते

–  टायफाईड झालेल्या रुग्णाचा ताप 102 से 104 डिग्री पर्यंत जाऊ शकतो.

असे राहा टायफाईडपासून दूर…

–  स्वच्छतेवर लक्ष द्या

–  गरम पाणी आणि साबणाने हात धुवावे

–  गरम पाणी प्यावे

–  फळे सोलून खावे

–  जेवण पूर्णपणे शिजवून खावे

–  सोशल डिस्टन्सिंग पाळा

–  जेवण शेअर करू नये. स्वत:च स्वत: खावे

–  दही, पेस्ट्री, तूप आणि तळलेले पदार्थ, मिठाई खाणे टाळावे.

–  दारु, सिगरेटचे सेवन करू नये.