U – 19 विश्वचषक : ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ‘टीम इंडिया’ ची उपांत्य फेरीत ‘धडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतानं 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतानं 74 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 234 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजीनंही कमाल केली. ऑस्ट्रेलियाला अवघ्या 159 धावांमध्ये समाधान मानावं लागलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी हा सामनावीर ठरला. त्यानं 24 धावांत 4 बळी घेतले.

कसा झाला सामना ?
टीम इंडियाच्या डावाची सुरुवाती फारशी समाधानकारक नव्हती. उपांत्य फेरीच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलदांजांनी भारताला धावसंख्येचा मोठा पल्ला गाठू दिला नाही. तरीही फटकेबाजी करत भारतानं 233 धावा केल्या. गोलंदाजी करतानाही भारतानं ऑस्ट्रेलियाला जास्त धावसंख्या करण्यास संधी दिली नाही. 159 धावांमध्येच टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला गारद केलं.

कोणी किती धावा केल्या ?
टीम इंडियाचा सलामीवीर दिव्यांश सक्सेना 14 धावांवर बाद बाद झाला. यावेळी टीम इंडियाच्या एकूण 35 धावा होत्या. यानंतर एकेक फलंदाज बाद होत गेले आणि टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी एका बाजूनं किल्ला लढवला. त्यानंही 62 धावांची खेळी केली. यशस्वी बाद झाल्यानंतर सिद्धेश वीर आणि अथर्व अंकोलेकर यानं भारताची धुरा सांभाळली. सिद्धेश 25 धावांवर बाद झाला. यानंतर रवी बिष्णोईनं 30 धावांची खेळी करत अथर्वला साथ दिली. अथर्वनं 54 चेंडूंमध्ये 55 धावांची नाबाद खेळी केली आणि टीम इंडियाची धावसंख्या 233 झाली.

You might also like