U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन – U-19 Women’s T20 WC | दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारीदरम्यान ‘आयसीसी’ 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची ओपनर शफाली वर्मा (Shafali Verma) या संघाचे नेतृत्व करणार आहे. याचबरोबर 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची घोषणा केली आहे. (U-19 Women’s T20 WC)

शफाली वर्माने 2019 मध्ये आंतराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. यामध्ये तिने आतपर्यंत 2 कसोटी, 21 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 46 ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ती आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेतही संघाचे नेतृत्व करणार आहे. हे सर्व पाचही सामने 27, 29, 31 तसेच, 2 आणि 4 जानेवारी रोजी प्रिटोरिया या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश आहे. या गटात भारतासह दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि स्कॉटलंड संघांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी पार पडणार आहे. (U-19 Women’s T20 WC)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी संघ : – शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार),
ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप,
अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री

19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी संघ :- शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, ऋचा घोष, जी त्रिशा,
सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा,
तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी

राखीव खेळाडू :- शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

Web Title :- U-19 Women’s T20 WC | shafali verma to lead india in under 19 women t20 world cup take place in south africa january

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत पूवर्वत करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन हवेतच?

Shambhuraj Desai | “आमची हिंमत पाच महिन्यांपूर्वीच दाखवली”; संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर