इस्त्रायलशी डिप्लोमेटिक संबंध प्रस्थापित करणारा पहिला आखाती देश बनणार UAE, ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – संयुक्त अरब अमीरात (युएई) आणि इस्त्रायलमध्ये अनेक वर्षांपासून असलेले शत्रूत्व आता संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी एक ऐतिहासिक करार केला आहे, ज्यानंतर युएई इस्त्रायलशी डिप्लोमेटिक संबंध प्रस्थापित करणारा पहिला आखाती देश बनणार आहे. हा शांतता करार करण्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे.

तिनही नेत्यांची फोनवर झाली चर्चा
व्हाईट हाऊसकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, गुरुवारी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली, ज्यानंतर या ऐतिहासिक कराराला मंजूरी देण्यात आली आहे.

मध्य पूर्वेत शांतता वाढणार
यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी एक संयुक्त वक्तव्यात आशा व्यक्त केली की, या निर्णयानंतर मध्य पूर्वेत शांतता वाढेल.

तिसरा इस्त्रायल-अरब करार
अद्यापपर्यंत इस्त्रायलचे आखाती देशांची कोणतेही राजकीय संबंध नव्हते. मात्र, दोन युएईशी विभक्त इस्त्रायलचे दोन अरब देश जॉर्डन आणि मिस्रसोबत डिप्लोमेटिक संबंध आहेत. इस्त्रायलच्या स्वातंत्र्यानंतर हा तिसरा इस्त्रायल-अरब करार असेल.

वेस्ट बँक प्रदेशावर ताबा मिळवण्याचा हेतू टळला
व्हाईट हाऊसनुसार या करारासह इस्त्रायलने वेस्ट बँक प्रदेशात कब्जा करण्याचा आपला हेतू सुद्धा टाळला आहे. मात्र, या प्रदेशात इराणमुळे इस्त्रायल आणि अरब देशांची चिंता कायम असते.

या मुद्द्यांवर वाटचाल करतील युएई आणि इस्त्रायल

* येत्या काही आठवड्यात इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमीरातचे प्रतिनिधी मंडळ गुंतवणूक, पर्यटन, थेट उड्डाण, संरक्षण, दूरसंचार आणि अन्य मुद्द्यांवर द्विपक्षीय करारावर हस्ताक्षर करतील.

* दोन्ही देशांकडून लवकरच राजदूत आणि दूतावासांच्या आदान-प्रदानाची अपेक्षा आहे.

* दोन्ही देश अबुधाबी ते तेल अवीवपर्यंत फ्लाईट सुरू करतील, ज्यामुळे युएईचे मुस्लिम येरुशलमच्या ओल्ड सिटीमध्ये अल-अक्सा मस्जिदला जाऊ शकतील.

* एवढेच नव्हे, तर इस्त्रायल आणि युएई आता कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर सुद्धा एकत्रित काम करतील.