UAE नं ‘इस्लामी’ कायद्यात केले बदल, ‘लिव्ह-इन’मध्ये राहणे आणि दारू पिण्याची असेल ‘सूट

दुबई : संयुक्त अरब अमीरात (युएई) ने देशाच्या इस्लामिक पर्सनल कायद्यात अनेक मोठ्या बदलांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अविवाहित जोडप्यांना सोबत राहण्याची परवानगी असेल. याशिवाय कायद्यानुसार दारूबाबतचे प्रतिबंध शिथिल करण्यात आले आहेत आणि ऑनर किलिंगला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

नव्या युएईच्या दिशेने टाकले पाऊल
युएईने मुस्लिम पर्सनल कायद्यात या बदलांनी व्यक्तीगत स्वातंत्र्याची कक्षा वाढवली आहे. पर्यटक, परदेशी उद्योजक आणि उद्योगांना आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहे. देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे आणि जागतिक स्थितीत सहभागी होण्यासाठी आपला विचार बदलत आहे.

इस्त्रायलशी करारानंतर बदल
हा निर्णय अमेरिकेच्या पुढाकाराने युएई आणि इस्त्रायलमधील संबंध सामान्य बनवण्यासाठी झालेल्या करारानंतर झाला आहे. यामुळे युएईमध्ये इस्त्रायली पर्यटकांचे येणे-जाणे वाढेल आणि गुंतवणुकीचे मार्ग खुले होतील.

दारू पिणे आणि बाळगण्याची सूट
नव्या कायद्यानुसार, 21 वर्ष किंवा त्यावरील कोणत्याही व्यक्तीला दारू पिणे, विकणे किंवा बाळगण्यासाठी दंड लागणार नाही. युएईच्या किनारपट्टीच्या शहरात बीयर बार आणि क्लबमध्ये दारू व्यापक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, अगोदर लोकांना दारू खरेदी करणे, वाहतूक करणे किंवा घरात ठेवण्यासाठी लायसन्स घ्यावे लागत होते.

लग्नाशिवाय एकत्र राहण्याची परवानगी
नव्या कायद्यात जोडप्यांना लग्नाशिवाय एकत्र राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, जे युएईमध्ये मोठ्या कालावधीपर्यंत एका गुन्ह्याच्या श्रेणीत होते. मात्र, परदेशी लोकांसाठी यात थोडी शिथिलता होती, पण शिक्षेचा धोका कायम होता. याशिवाय आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा इस्लामी कायद्यात निषिद्ध आहे, तो सुद्धा संपुष्टात आणला आहे.

ऑनर किलिंग गुन्ह्याच्या श्रेणीत
यूएई सरकारने महिलांच्या अधिकारांचे रक्षण चांगल्या प्रकारे करण्यासाठी ’सन्मान गुन्हे’ पासून बचावासाठी कायद्यात बदल केले आहेत, ज्याअंतर्गत ऑनर किलिंगला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले आहे. अगोदर एखाद्या महिला नातेवाईकावर हल्ला केल्यानंतर व्यक्ती यासाठी वाचत होता, जर तो व्यक्ती हे सिद्ध करू शकला की ती महिला घराच्या सन्मानाशी खेळ करत होती.

वर्ल्ड एक्सपोचे नियोजन
हे बदल अशावेळी करण्यात आले आहेत, जेव्हा संयुक्त अरब अमीरात वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करणार आहे. या आयोजनाने व्यावसायिक हालचाली वाढतील तसेच अडीच कोटीपेक्षा जास्त लोकांचे येणे-जाणे सुद्धा होईल आणिक कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीनंतर पर्यटनाला चालना मिळेल.