UAE : आता वाळवंटात सुद्धा पिकणार फळभाज्या, ‘हे’ खास तंत्रज्ञान दाखवणार आपली ‘कमाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वाळूने वेढलेल्या युनायटेड अरब अमीरात (यूएई) ला एक मोठे यश मिळाले आहे. लॉकडाऊनच्या 40 दिवसात एका प्रयोगादरम्यान यूएईने जगाला हे दाखवून दिले आहे की, वाळूमध्ये फळभाज्यांची शेती केली जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी वाळूमध्ये टरबूज आणि दुधी भोपाळसारख्या फळभाज्या पिकवल्या आहेत.

वाळूने घेरलेले असल्याने यूएई आपली ताज्या फळभाज्यांची 90 टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करत आहे. परंतु आता यूएई या प्रयोगाचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. यातून यूएईला मोठा फायदा होताना दिसत आहे. लिक्विड नॅनोक्ले म्हणजे ओल्या चिकन मातीच्या पद्धतीचा वापर करून हे यश मिळवण्यात आले आहे.

ही एक प्रकारची मातीला पुनर्जीवित करण्याची पद्धत आहे, यातून पाण्याच्या वापरात 45 टक्केपर्यंत कमी येत शकते. यूएईने घोषणा केली आहे की, ते या पद्धतीचा वार करून एक फॅक्टरी सुरू करणार असून याचा व्यवसायिक उपयोग सुरू केला जाईल. लिक्व़िड नॅनोक्ले तंत्रज्ञानात चिकट मातीचे खुप छोटे-छोटे कण द्रवरूपात वापरले जातात.

या पद्धतीमध्ये सॉईल केमिस्टीच्या कॅटॉनिक एक्सचेंज कपॅसिटीच्या सिद्धांताचा वापर करण्यात आला आहे. रसायनिक संरचनेमुळे चिकन मातीचे कण निगेटिव चार्ज होतात, परंतु रेतीचे कण पॉझिटिव्ह चार्ज होतात. ही पद्धत विकसित करणारी नॉर्वेची कंपनी डेजर्ट कंट्रोलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष ओले सिवट्सन यांचे म्हणणे आहे की, विरूद्ध चार्ज होण्याच्या कारणामुळे जेव्हा रेतीमध्ये मातीचे मिश्रण मिसळते तेव्हा एक बंध तयार करतात.

या बंधाला जेव्हा पाणी मिळते, त्याचे पोषकतत्व त्याच्यासोबत चिकटले जातात. अशाप्रकारे एक अशी माती तयार होते, ज्यामध्ये पाणी थांबू लागते आणि रोपे मुळं धरू लागतात. सिवट्सन यांनी सांगितले की, 40 स्क्वेअर फुटच्या शिपिंग कंटेनरमध्ये लिक्विड नॅनोक्लेचा प्लँट लावला जाईल.

रेती प्रधान देशात अशाप्रकारचे अनेक कंटेनर लावले जातील, जेणेकरून तेथील स्थानिक मातीतून त्या देशाच्या वाळवंटात शेती करता यावी. या पद्धतीचा वापर जर एक वर्ग मीटर जमीनीवर केला जात असेल तर याचा खर्च 150 रुपये येतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like