‘UAE’नं पाकिस्तानला ‘सुनावलं’ ! ‘काश्मीर’ मुद्यामध्ये मुस्लिमांना ‘विनाकारण’ ओढू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अब्देल बिन अहमद अल जुबैर आमि UAE चे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद बि सुल्तान अल नाह्यान यांना बुधवारी पाकिस्तानचा दौरा केला. यावेळी त्यांनी पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यांच्याशी काश्मीरच्या मुद्यावर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान पाकला चांगलीच चपराक खावी लागली. पाकचे मंत्री कुरेशी यांनी या दोन्ही नेत्यांसमोर काश्मीरचा मुद्दा ठेवला आणि भारताला त्यांच्या निर्णय बदल्यासाठी विनंती करा असे सांगितले. पाक पंतप्रधान इमरान खान यांनी दोन्ही नेत्यांना सांगितले की, सौदी अरब आणि UAE सह संपूर्ण जगाने भारताच्या निर्णयाला विरोध करुन तो बदलायला लावला पाहिजे. परंतू पाकला यात देखील निराशाचा आली.

दोन्ही देशांनी सांगितले की या मुद्यावर मुसलमानांना मध्ये आणू नका –
यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की काश्मीर हा भारत आणि पाकचा द्विपक्षीय प्रश्न आहे. ते म्हणाले की दोन देशांच्या मध्ये मुस्लिम वर्ल्ड आणि मुसलमानांना मध्ये आणू नका. UAE चे परराष्ट्र मंत्री देखील म्हणाले की, भारत पाकने मिळून काश्मीर मुद्दा सोडवावा, त्या मुसलमानांना मध्ये आणू नये.

इमरान खान म्हणाले, दोन्ही देशांनी दिले सहयोगाचे आश्वासन –
या प्रकरणी इमरान खान म्हणाले की, दोन्ही देशांनी सध्याच्या परिस्थितीवर समाधान व्यक्त केले आहे. तणावाला कमी करणे आणि शांतता तसेच सुरक्षेची परिस्थिती निर्माण करण्यास सहयोग करेल.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे, पाक अनेक देशांकडे मदतीसाठी आणि भारताच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विनंती करत आहे. परंतू अजूनही कोणताही देश पाकला मदत देऊ इच्छित नाही. परंतू भारताच्या निर्णयाला अनेक देशांना समर्थन दिले आहे.