UAE नं भारताला वगळून पाकसह 12 देशांना प्रवासी व्हिजा जारी करण्यावर लावला प्रतिबंध

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – संयुक्त अरब अमीरात (यूएई) ने पाकिस्तान आणि 11 अन्य देशांतून येणार्‍यांना नवीन व्हिजा जारी करण्यावर अस्थायी प्रकारे प्रतिबंध लावला आहे. या 12 देशांमध्ये भारताचा समावेश नाही. पाकिस्तान वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने बुधवारी या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, यूएई अधिकार्‍यांनी घेतलेला हा निर्णय देशात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी संबंधित मानला जात आहे.

पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते जाहिद हाफिज चौधरी यांनी म्हटले की, यूएईने पाकिस्तानसह 12 देशांसाठी पुढील घोषणेपर्यंत अस्थायी प्रकारे नवीन प्रवास व्हिजा जारी करणे निलंबित केले आहे. त्यांनी म्हटले की, अगोदरपासून जारी व्हिजासाठी निलंबन लागू असणार नाही.

पाकिस्तानशिवाय, यूएई सरकारने तुर्की, इराण, यमन, सीरिया, इराक, सोमालिया, लीबिया, केनिया, आणि अफगाणिस्तानच्या अन्य लोकांसाठी प्रवासी व्हिजा जारी करणे निलंबित केले आहे. यूएई सरकारकडून हा निर्णय पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या कोविड 19 प्रकरणांबाबत आहे. मागील एक आठवड्यात देशात कोरोना व्हायरसची 2,000 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

यापूर्वी, जूनमध्ये यूएईने पाकिस्तानमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता प्रवासी सेवांसाठी अस्थायी निलंबनाची घोषणा केली होती. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोविड 19 ची एकूण 3,63,380 प्रकरणे समोर आली आहेत. सध्या देशात 30,362 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.