PF खातेदारांनी ‘हे’ केलेच पाहिजे, नाही तर पैसे मिळणार नाहीत

मुंबई : वृत्तसंस्था – नोकरदारांची हक्काची बचत म्हणजे भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंडातून पैसे काढणे पूर्वी अत्यंत कठीण काम होतं, आता ते सुलभ करण्यात आलं आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही ऑनलाइन क्लेम करू शकता. पण अजूनही ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आपली KYC यनिव्हर्सल नंबरला (UAN) जोडलेली नाही. त्यामुळे पीएफ खातेधारक EPFO ऑनलाइन सेवेचा फायदा घेऊ शकणार नाहीत. सरकारने ईपीएफओच्या सीमेत येणाऱ्या कंपनी आणि संस्थांच्या पीएफ धारकांना KYC पूर्ण करण्यास सांगितले आहे.

KYC चे फायदे
ज्या पिएफ धारकाचे KYC पूर्ण झाले आहे अशा खातेधारकाचे पैसे लगेच ट्रान्सफर होणार आहेत.
जर पिएफ धारकाचे बँक डिटेल्स नसतील तर क्लेमसाठी केलेली रिक्वेस्ट रद्द होऊ शकते.
तुम्हाला मेसेज द्वारे कोणतीही माहिती मिळणार नाही.
ईपीएफओ युएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जाऊन तुम्ही KYC अपडेट करू शकता.

KYC कशी करायची
KYC साठी करण्यासाठी तुम्हाला UAN पोर्टल वापरावे लागेल.
बेबसाइटवर जा आणि KYC या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पॅन, आधार, मोबाईल नंबर, बँक अकाउंट या विभागात जाऊन एक पर्याय निवडा
निवडलेल्या पर्यायामध्ये तुम्ही सर्व माहिती भरा आणि नंतर सबमिट वर क्लिक करा.
सबमिट केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल. आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाले का हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा.
पॅन आणि आधार कार्ड व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन सुविधा सुरू होईल.

कोणती कागदपत्र लागतात
UAN संबधीत KYC मध्ये आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, पॅन आणि मोबाईलनंबर लागतो.
ज्यावेळी खातेधारक KYC UNA सोबत लिंक करतो त्यावेळी पिएफ संबंधी सर्व माहिती आपल्या मोबाईलवर मिळू शकते.

कधी मिळणार पैसे
ज्या PF खातेधारकांना पैसे काढायचे आहेत आणि त्यांनी पैसे काढण्यासाठी रिक्वेस्ट केली. आणि जर खातेदाराने KYC अपडेट केले असेल तर त्यांना ३ दिवसांत पैसे मिळू शकतात.