Uber जगभरात करणार कर्मचारी ‘कपात’, भारतावर होणार ‘हा’ परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ऑनलाईन कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी उबेरने आपल्या 10 ते 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील रायडर हेलिंग कंपनी जगभरातील 350 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तोट्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

यामुळे उबेर इट्सवर देखील होणार परिणाम
मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या 350 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असून यामुळे उबेरच्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी देणाऱ्या उबेर इट्स या कंपनीवर देखील परिणाम होणार आहे. सध्या भारतात उबेरचे 350 ते 400 कर्मचारी आहेत. मात्र जवळपास 70 टक्के कपात हा अमेरिकेतील आणि कॅनडातील कर्मचाऱ्यांची केली जाणार आहे. उबरचे सीईओ दारा खुसरोशाही या महिन्यात भारतात येणार आहेत. मात्र याचा कामगार कपातीशी काहीही संबंध नाही.

दुसऱ्या तिमाहीत 36,920 कोटी रुपयांचा तोटा
जगभरातील उबेरच्या एकूण व्यवसायात भारतातील उबेर व्यवसायाचा वाटा हा केवळ 2 टक्के आहे. मात्र खर्च वाढल्याने काही कपात केली जाऊ शकते. 2019 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीला 36,920 कोटी रुपयांचा तोटा आला आहे तर पहिल्या तिमाहीत 26,270 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळे आता खर्चात कपात करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांची देखील कपात करण्यात येणार आहे.
दरम्यान, उबेरचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला असून जुलैमध्ये देखील कंपनीने कर्मचारी कपात केली होती. मात्र याचा भारताच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नाही.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी