ट्राफिक जॅमवर ‘जालिम’ उपाय ; ‘उबेर’ टॅक्सी देणार ‘एअर’ टॅक्सी सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील वाहनांची संख्या वाढत असताना आता रस्ते देखील कमी पडू लागले आहेत. त्यामुळे शहरी भागात तर वाहतूक कोंडी ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे यावर आता विविध वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या पर्याय शोधू लागले आहेत. त्यामुळे की काय आता उबेर या भारतात टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीने एअर टॅक्सी सुरु करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरु केली आहे.

भारताबरोबर या देशात देखील उबेर देऊ शकते एअर टॅक्सी सेवा –

केंद्र सरकारच्या एव्हिएशन मंत्रालयाशी गेल्या वर्षापासून वाहतूक कंपन्यांचे याबाबत बोलणे सुरु आहे. या संबंधी वाहतूक कंपन्या नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उबेर हेड निखील गोयल यांनी सांगितले की, हवाई प्रवाशी वाहतूक सुरु करण्यासाठी योग्य आरखडा माजी हवाई मंत्री जयंत सिन्हा आणि त्यांच्या मंत्रालयातील आधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याच्या दृष्टिकोनातून भारतातील ड्रोन रेग्युलेशनबरोबर एरियल मोबिलिटीवर चर्चा झाली आहे. याच कारणाने येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी हा पर्याय असणार आहे. उबेरने आपली एअर सेवा देण्यासाठी भारताबरोबरच फ्रान्स, जपान, ब्राझील तसेच ऑस्टेलिया या देशांना एअर प्रोजेक्टचा प्रस्ताव दिलेला आहे.

उबेरचे एलिवेट हेड एरिक एलिसन यांनी उबेर एअर टॅक्सी लॉन्चिग करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा कालावधी निश्चित केला असल्याचे निखिल गोयल यांनी स्पष्ट केले. भारतात एअर वाहतूक सुरु करताना सावधानता बळगणे आवश्यक आहे. असे असले तरीभारताची लोकसंख्या मोठी असल्याने येथे काम करण्यास वेगळा आनंद मिळत असल्याचे ते म्हणाले.

सेवेस होऊ शकतो विलंब –

नागरिकांची सुरक्षा, प्रशिक्षित पायलट, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्याचा विचार करता देशातील या एअर टॅक्सीच्या सेवेबाबत केंद्र सरकारच्या हालचाली संथगतीने होत आहेत. असे असले तरी इतर देशांनी देखील या बाबतचा निर्णय अजून दिलेला नाही.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार