‘आजोबा’ घनश्याम दास बिर्ला यांनी स्थापन केलेल्या यूको बँकेत ‘नातू’ यशोधन बिर्ला हे ‘डिफॉल्टर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील बँक यूको बँकेने बिर्ला सुर्या कंपनीचे 67.65 कोटीचे कर्ज फेडले नाही म्हणून कंपनीचे चेअरमन यशोवर्धन बिर्लाला ‘विलफुल डिफॉल्टर्स’ म्हणून घोषित केले आहे. यूको बँकेने बिर्लाला फोटो सहित एक सार्वजनिक नोटीस पाठवली आहे. नोटीस नुसार बिर्ला सुर्याला 100 फंडचे क्रेडिट लिमिट मंजूर करण्यात आले होते.

खात्याला नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणून घोषित –

बिर्लाला देण्यात आलेले हे क्रेडिट मल्टी क्रिस्टलीन सोलर फोटोवोल्टिक सेल्सच्या निर्माणसाठी होते. बराच काळ कर्ज फेडण्यात न आल्याने बँकेने अखेर ती नॉन परफॉर्मिंग असेट्स मध्ये टाकले होते. या आधी बँकेने कर्जाच्या परत फेडीसाठी अनेक नोटीसा पाठवल्या होत्या. त्यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्याने 3 जूनला बँकेने बिर्ला यांच्या खात्याला नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणून घोषित केले.

आजोबांनीचं स्थापन केलेल्या बँकेचे पैसे नातवाने थकवले –

विशेष म्हणजे यूको बँकेची स्थापना यशोवर्धन बिर्ला यांचे आजोबा घनश्याम दास बिर्ला यांनी केली होती. घनश्याम दास बिर्ला महात्मा गांधीच्या जवळेचे होते. बिर्ला परिवाराची आज देखील देशातील प्रमुख औद्योगिक परिवारांमध्ये गिनती होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या गांधीजींच्या आव्हानानंतर अनेकदा आर्थिक मदत केली होती.

यशोवर्धन बिर्ला हे बिर्ला सुर्या कंपनीचे डायरेक्टर आहेत. ते यश बिर्ला ग्रुपचे प्रेसिडंट देखील आहेत. नोटीस नुसार बिर्ला सुर्या लिमिटेडने मुंबईच्या नरिमन पाईंट येथील यूको बँक मधून कर्ज घेतले होते. बँकेने आपल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की कर्ज घेणारी कंपनी, त्याचे डायरेक्टर, प्रोमोटर, गॉरंटरला बँकेकडून विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात येेत आहे.

बँकेच्या विलफुल डिफॉल्टरमध्ये मेहून चौक्सीचे देखील नाव –

या आधी बँकेने 7 जणांना विलफुल डिफॉल्टर घोषित केले आहेत. त्यात गिंताजली ज्वेलर्सचे मेहूल चौक्सी, अभिजीत फेरोटेक आणि काइजेन पॉवरचे मनोज जायसवाल आणि आभिषेक जायसवाल यांचा समावेश आहे.भारतातील बँका आधीच आर्थिक कारणांनी ग्रस्त असताना डिफॉल्टर मधील यादीत भर पडत आहे. त्यामुळे नॉन परफॉर्मिंग असेट्सने बँका हैराण झाल्या आहेत.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा