UCO Bank New Debit Card | युको बँकेच्या नवीन कार्डने 2 लाखांपर्यंतची खरेदी करा, मोफत आरोग्य तपासणीचाही लाभ घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UCO Bank New Debit Card | सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेने Rupay Select नवीन डेबिट कार्ड (UCO Bank New Debit Card) लाँच केले आहे. या कार्डच्या मदतीने यूजर्स 2 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करू शकतात. तसेच एटीएममधून ५० हजार रुपये देखील काढता येणार आहेत. UCO बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने ही सुविधा सुरू केली आहे.

 

UCO बँकेचे कार्यकारी संचालक इशराक अली खान (ishraq ali khan) म्हणाले की, रुपे सिलेक्ट कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड (RuPay Select Contactless Debit Card) प्रीमियम आणि एचएनआय (HNI) ग्राहकांच्या गरजा आणि जीवनशैली लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. जिम मेंबरशिप, घरापासून ते ते आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये प्रीमियम सुविधा कार्डद्वारे मिळू शकतात.

 

10 लाखांचे विमा संरक्षण मिळेल.
रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड मध्ये, ग्राहकाला 10 लाख रुपयांपर्यंतचे सर्वसमावेशक विमा संरक्षण मिळते. यामध्ये वैयक्तिक अपघात विमा आणि कायमस्वरूपी अपंगत्व संरक्षण 10 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. कार्डधारक कार्डद्वारे POS किंवा ई-कॉमर्स ( e-commerce) प्लॅटफॉर्मवर 2 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करू शकतात. त्याच वेळी, एटीएममधून 50,000 रुपये काढण्याची मर्यादा (ATM Withdrawal Limit) देखील उपलब्ध आहे.

इतरहि फायदे आहेत.
या कार्डवर दर महिन्याला दोन मोफत डोमेस्टिक लाउंज प्रवेशाचा लाभ घेता येईल. 15 शहरांमधील 25 पेक्षा जास्त विमानतळांवर लाउंजमध्ये मोफत प्रवेश. कार्डधारक एका वर्षात दोन विनामूल्य आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये प्रवेश करू शकतील. 300 हून अधिक शहरांमधील 500 हून अधिक विश्रामगृहामध्ये प्रवेश आहे. 15 दिवस मोफत जिम मेंबरशिप आणि 40-50 टक्के सवलत सदस्यत्व वाढवल्यावर मिळेल. वर्षभरात एक मोफत प्रीमियम आरोग्य तपासणी पॅकेज.

 

Web Title :-  UCO Bank New Debit Card | uco bank rupay select contactless debit card launched know all details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा