भाजपाच्या आमदारवर FIR दाखल, लग्नाच्या आमिषानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

उदयपूर : वृत्तसंस्था – मेवाड येथील उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार प्रतापलाल भिल यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने उदयपूर रेंजचे आयजी सत्यवीर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरोधात गोगुंदा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला मूळची मध्य प्रदेशातील नीमच भागातील आहे, तर ३ वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान आमदार प्रतापलाल भिल यांची भेट घेतली होती. यानंतर या आमदारांनी आपल्याशी जवळीक वाढवली. यादरम्यान अनेकदा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप त्या पीडित महिलेने केला आहे. तसेच प्रतापलाल भिल यांनी उदयपुरातील सुखेर आणि नीमचमधील फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर आमदार आता लग्नाच्या आश्वासनापासून लांब जात आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार घेऊन आयजीसमोर हजर झाली, असे पीडित महिलेने सांगितले.

दरम्यान, या तक्रारीनंतर आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरोधात गोगुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण आमदाराशी संबंधित असल्याने याची चौकशी करण्यासाठी राज्य मुख्यालयामार्फत सीआयडी, सीबीकडे पाठविले जाणार आहे. तर दुसरीकडे, अशा कोणत्याही प्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचे आमदार प्रतापलाल भिल यांनी सांगितले आहे. गोगुंदा मतदारसंघातून प्रतापलाल भिल हे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

तर सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहून उदयपूर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरूद्ध एफआरआय दाखल केला आहे. हे प्रकरण सीआयडी सीबीकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडी सीबी करणार आहे. याआधी पोलिसांनी संबंधित महिलेची वैद्यकीय तपासणी केली आहे. तर दुसरीकडे, आमदार प्रतापलाल भिल यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती फेटाळून लावली आहे.