Uday Samant | आदित्य ठाकरे यांना राहुल गांधींच्या यात्रेत पाहुन उदय सामंतानी साधला निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uday Samant | कन्याकुमारीवरुन काश्मीरला जाण्यासाठी सुरु झालेली काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा सध्या महाराष्ट्रात चालत आहे. या यात्रेला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील राहुल यांच्यासोबत यात्रेत सहभाग घेतला आहे. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केले आहे.

 

माझ्याकडून आदित्य ठाकरेंना शुभेच्छा आहेत. त्यांचा पक्ष आणि संघटनेची ती भूमिका आहे, त्यावर मी काहीही बोलणार नाही. आदित्य ठाकरे श्रीनगरपर्यंत जाणार आहेत का, असा चिमटा यावेळी सामंत (Uday Samant) यांनी काढला. तसेच यावेळी सामंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena chief Balasaheb Thackeray) यांचा काँग्रेसला असलेला विरोध देखील सांगितला. जर मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली, तर मी माझे शिवसेना हे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र, आज आदित्य ठाकरे काँग्रेससोबत यात्रेत चालत आहेत. हे योग्य की अयोग्य हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल. बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा काँग्रेससोबत न जाण्याचा होता. त्यामुळे आता त्यांचे विचार घेऊन कोण वाटचाल करत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसेल, असे उदय सामंत यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी देखील यात्रेतील आपले अनुभव सांगितले आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
माझ्यासोबत महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले आहेत. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेवरुन आणि त्यांना जामीन देताना न्यायालयाने केलेल्या निरीक्षणावरुन सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट आहे.
देशात आता लोकशाही उरली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uday Samant | aditya thackeray in rahul gandhis bharat jodo yatra the shinde group hit the target asked the minister udaya samant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना