शिवसेना नेत्याचे राज्यपालांकडून कौतुक; उलटसुलट चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीची राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून सरकार आणि राज्यपाल यांच्यातील कलगीतुरा वारंवार पाहायला मिळाला आहे. तर शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. अशात नांदेड विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेना नेते आणि उच्च, शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

गत दीड वर्षापासून राज्यात शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा राजकिय संघर्ष सातत्याने पहायला मिळतोय हे विळ्या-फोपळ्याचं नातं आता सर्वांनाच चांगलंच माहीती झालंय. अशातच नांदेड विद्यापिठाच्या दिक्षांत सभारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीरपणे थेट शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे सर्वच जण अचंबित झाले आहेत. कोणाला काहीही एक समजेनासे झाले आहे. राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, तुम्हाला सर्वांना शिक्षण मंत्र्यांनी खूप काही सांगितलं त्यामुळे मला खूप चांगल वाटलं. मी त्यांच्यासोबत विद्यापीठाच्या विविध विषयांच्या संदर्भात असतो. मंत्री सामंत यांनी ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि खासकरुन शिक्षणमंत्र्यांचं अभिनंदन करतो असे ते म्हणाले. यावरून राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. राज्यपाल आणि शिवसेनेचं नातं आता संघर्षाकडून समझोत्याकडे जात आहे कि काय यावरही चर्चा रंगू लागली आहे.