Uday Samant । 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोनाच्या (corona) महामारीमुळे गेली दोन वर्ष शाळा कॉलेज यांना कुलुप लागलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा ऑनलाईनला या काळात जादा प्राधान्य दिल जात आहे. तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आज पुणे (pune) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन (College) शैक्षणिक वर्ष (Academic year) सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मंत्री सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे. तर या विषयावर लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं सामंत म्हणाले. त्यावेळी ते पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. college academic year will start from september 15 informed uday samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्राध्यापक भरती (Professors Recruitment ) थांबली होती.
ही भरती प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर, राज्य सरकारच्या (State Government) या निर्णयामुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार 74 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती होणार आहे.
याबाबत प्रक्रिया आगामी आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
या दरम्यान, 121 जागांवरती ग्रंथपाल भरती आणि विद्यापीठांमधील 659 जागांवरती अन्य भरती करण्यास राज्य सरकारने (State Government) मान्यता दिली असल्याचं देखील उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे.

Web Title : college academic year will start from september 15 informed uday samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold price today | 10000 रुपये स्वस्त मिळत आहे सोने, 2 महिन्याच्या खालच्या स्तरावर पोहचली किंमत, जाणून घ्या आजचा भाव