Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील दोन्ही गटात सातत्याने कोणता ना कोणता वाद सुरु असतो. दोन्ही गट सातत्याने विरोधी गटातील नेत्यांना स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला गुवाहाटीला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे कारण त्यांनी देवीला केलेला नवस फेडायचा आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु आज जेव्हा ते देवीच्या दर्शनाला निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्या गटातील 6 आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात होते. या तर्कवितर्कांचे उत्तर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले आहे. कदाचित, जातोय त्यापेक्षा जास्त लोक आमच्याबरोबर माघारी येतील, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

सत्तांतरादरम्यान, एकनाथ शिंदे आणि टीम कामख्या देवीला गेले होते. तिथे जाऊन त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असा नवस केला होता. तो नवस पूर्ण होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व आमदारांसह नवस फेडायला गेले आहेत. मुंबई विमानतळावरून गुवाहाटीला निघण्यापूर्वी मंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा काही आमदार या यात्रेत त्यांच्या बरोबर नसल्याने चालू असलेल्या चर्चे बद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले,’ चर्चा काहीही असो आम्ही सर्व एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्तच लोक असतील.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेले काही दिवस ठाकरे गटाकडून मध्यावधी निवडणुकांचे दावे केले जात आहेत.
या दाव्यांना उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. “मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही.
काही लोकांना भीती वाटते की आपल्याकडचे लोक इकडे-तिकडे जातील! त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळं चाललंय. सत्ता येणार आहे, हे त्यांना कायमस्वरूपी सांगत राहण्यासाठी असं बोललं जातं. यामागे मोठं राजकारण आहे, अन्यथा यात काही तथ्य नाही.” असे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

Web Title :- Uday Samant | eknath shinde guwahati visit minister uday samant on thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने लॉकअपमध्ये घेतले डोके फोडून; ससूनमध्ये गळ्यावर काचेने जखमा करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्याने केला लोहगाव परिसरात गोळीबार, 3 राऊंड केले फायर