Uday Samant In Hadapsar Pune | भगव्याला विश्वासात घेतल्याशिवाय आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महापौर ठरणार नाही – मंत्री उदय सामंत

एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी कामे कशी करावीत याचा आदर्श नाना भानगिरे यांच्याकडून इतरांनी घ्यावा

पुणे / हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन – Uday Samant In Hadapsar Pune | भगव्याला विश्वासात घेतल्याशिवाय आगामी पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) निवडणुकीत (PMC Elections 2022) महापौर (Mayor) ठरणार नाही. अशी ताकद शिवसैनिकांनी (Shivsena) निर्माण करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या सर्वांचे पुण्याकडे लक्ष आहे. त्यामुळे शिवसैनिक, शिवसेनेचे नगरसेवक (Shivsena Corporators) व पदाधिकारी यांच्या माध्यमातून पुण्याला विकासनिधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी कामे कशी करावीत याचा आदर्श नाना भानगिरे (Corporator Nana Bhangire) यांच्याकडून इतरांनी घ्यावा, असे गौरवोद्गारही मंत्री सामंत यांनी काढले. (Uday Samant In Hadapsar Pune )

 

सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीतील पाण्याचे जलपूजन तसेच कै. दत्तोबा उर्फ आप्पा शंकरराव तरवडे पाझर तलाव, मोठ्या व्यासाची पावसाळी लाईनचे लोकार्पण मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, शहर संजय मोरे, प्रमुख गजानन थरकुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, पाणी पुरवठा विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, बी. जी. कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, विद्या होडे, युवा सेना सहसचिव किरण माळी, हडपसर विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, तानाजी लोणकर, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, उपविधानसभा प्रमुख नितीन गावडे, राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष उल्हास तुपे, शिवसेना विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, देवेंद्र भाट, अयोध्या आंधळे, सचिन तरवडे, संतोष भानगिरे आदींसह शिवसैनिक व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान नाना भानगिरे यांच्यावतीने टेनिसपटू राधिका महाजन हिला पुढील प्रशिक्षणासाठी 5 लाखांची मदत करण्यात आली. (Uday Samant In Hadapsar Pune)

त्याचा धनादेश मंत्री सामंत यांच्या हस्ते देण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर म्हणाले की नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रभागात केलेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यावर हडपसर भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

पिण्याचे पाणी दिले; डुक्कर मुक्त प्रभाग केला
पाण्यासाठी माता – भगिनींची होणारी वणवण मला बघवत नव्हती. याशिवाय नवीन प्रभाग क्रमांक ४४ व ४६ महमंदवाडी – उरुळी देवाची काही भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे मी स्वखर्चाने पाण्याचे टॅंकर सुरू केले. रखडलेल्या पाणी योजनेला पाठपुरावा करून गती दिली आणि काम पूर्ण करून आज जलपूजन होत आहे. त्याचे मोठे समाधान आहे. विरोधक कामात अडथळा निर्माण करत होते म्हणून पाणी यायला उशीर झाला आणि आता श्रेय घायला पुढे येत आहे. हे खेदजनक आहे.

हांडेवाडी रस्त्यावर मोठी पावसाळी लाईन टाकल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही.
तसेच डुक्कर मुक्त प्रभाग करण्यातही मोठे यश आले आहे. यापुढेही प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस कटिबद्ध आहे.
माजी नगसरसेवकांनी कामात अडथळे आणले त्यामुळे पाणीपुरवठा योजना तीन महिने लांबली हा निधी जनतेच्या खिशातील आहे.
40 आंदोलने करून प्रभाग डुक्करमुक्त केला आहे.
पालिकेत सत्तेत नसताना 40 ते 50 कोटींचा विकासनिधी आणून जनतेच्या हिताची कामे केली आहेत.

 

 

Web Title :- Uday Samant In Hadapsar Pune | Without believing in Shivsena anybody will not be the mayor in the upcoming Pune Municipal Corporation elections Minister Uday Samant

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा