Uday Samant | उद्योगमंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले; भर समुद्रात बोट पडली बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे मांडवा येथून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान अचानक त्यांची (Uday Samant) बोट बंद पडली. सर्व बोटची यंत्रणाच ठप्प झाल्याने कॅप्टनला रेस्क्यूसाठी SOS हा आपात्कालिन संदेश देखील पाठविता येत नव्हता. मात्र, सुदैवाने फार मोठा अपघात टळला.

 

बोट अचानक बंद पडल्यानंतर प्रसंगावधान दाखवत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय्य सहाय्यकाने दुसरी स्पीड बोट बोलावली. त्याचप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत हे सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. भर समुद्रात हे संकट ओढावताच प्रसंगावधान राखत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही तात्काळ प्रयत्नं करून दुसरी स्पीड बोट (Speed Boat) मागवली. मागवलेली दुसरी बोट काही वेळातच घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाली. त्यामुळे भर समुद्रात भरकटत चालेल्या स्पीड बोटीला दूसऱ्या बोटीची मदत घेत भर समुद्रात बचाव कार्य करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना सुखरूप परत आणले.

 

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे अलिबाग ते मुंबई असा स्पीड बोट प्रवास करत होते. यादरम्यान त्यांच्या स्पीड बोटचे इंजिन बंद पडले. त्यानंतर समुद्रातील लाटांमुळे त्यांची बोट भरकटत होती. त्याचवेळी उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने मोबाईलला कमी रेंज असताना देखील कॉल कनेक्ट करत दुसरी बोट मागवली. त्यामुळे हा फार मोठा अपघात टळला.

दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
हे नुकतेच दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेहून (World Economic Forume) परतले आहेत.
दरम्यान यावेळी महाराष्ट्रासोबत सुमारे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात
आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

Advt.

Web Title :- Uday Samant | maharashtra minister uday samant spped boat stopped in sea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना