Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री (Industries Minister) उदय सामंत (Uday Samant) यांच्या बोटीचा मांडवा जेट्टी जवळ अपघात (Boat Accident) झाला. जेटीजवळ बोट पार्क करत असताना चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी अलिबाग येथून परतत असताना हा अपघात झाला. यापूर्वी अलिबाग येथून परतत असताना सामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती.

यंदा किल्ले रायगडावर (Raigad Fort) 350 वा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. त्यानिमित्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय समांत (Uday Samant), आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi), रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर (Konkan Commissioner Dr. Mahendra Kalyankar) यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला उदय सामंत स्पीडबोटने (Speedboat) अलिबाग येथे जाण्यास निघाला होते. समुद्रात बोटीचा वेग कमी होता. मात्र, मांडवा जेट्टीजवळ (Mandwa Jetty) बोट आली असता चालकाने बोटीचा वेग वाढवला. त्यामुळे त्याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेट्टीकडे गेली. सुदैवाने बोट जेट्टीवर आदळली नाही. या अपघातात सामंत आणि छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले. स्पीडबोटच्या गिअर मध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही क्षण आपल्या काळजाचा ठोका चुकला होता, असे सामंत यांनी सांगितले.

या घटनेनंतर पालकमंत्री सामंत हे मांडवा येथे सुखरुप उतरुन रस्ते मार्गाने अलिबागच्या दिशेने रवाना झाले.
यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, सुरुवातीला काय घडत आहे याचा अंदाज आम्हाल आला नाही.
बोट जाऊन खांबांना आपटली तेव्हा लक्षात आले हे काही तरी भयंकर घडत आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही.
काही दिवसांपूर्वी याच मार्गावर प्रवास करताना स्पीडबोट वाटेतच बंद पडली होती.
यापुढे स्थानिक आमदारांना सोबत घेऊनच बोटीने प्रवास करायचे मी ठरवले असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Web Title :-  Uday Samant | minister uday samant boat accident at mandwa aligab raigad

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rahul Gandhi | राहुल गांधींना सूरत कोर्टाकडून जामीन मंजूर, खासरदारकी पुन्हा मिळणार?

Ajit Pawar | संभाजीनगर राड्यात राष्ट्रवादीचा हात, अजित पवार भाजप खासदारावर संतापले, म्हणाले-‘वेगवेगळ्या पक्षांची नावं घेण्यापेक्षा चौकशी करा, होऊन जाऊद्या…’

Devendra Fadnavis | ‘फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’, भाजपच्या माजी मंत्र्याचं भरसभेत अजब विधान