Uday Samant | जितेंद्र आव्हाडांवर जी कारवाई झाली आहे, ती कायद्यानुसार झालेली आहे – उदय सामंत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील एका मॉलमध्ये त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला होता. तसेच यावेळी त्यांनी अनेक प्रेक्षकांना मारहाण देखील केली होती. त्यांच्या विरोधात एका प्रेक्षकाने वर्तक नगर पोलिसांत (Vartak Nagar Police Station, Thane) तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जी काही कारवाई झाली आहे, ती कायद्यानुसार झालेली आहे, असे उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

 

त्यांनी एका चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांनी काही प्रेक्षकांना मारहाण केली होती.
त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला मारहाण केली होती.
आणि जर का मारहाण झाली असेल, तर त्यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे. त्यांना झालेली अटक हा चौकशीचा आणि कारवाईचा भाग आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांना पोलिसांचे काम करु दिले पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचे काम पोलिसांना करु दिले पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांच्या नावे ही तक्रार केली गेली होती. त्यामुळेच त्यांना अटक केली गेली आहे, असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

राज्यातील गड आणि किल्ले यांची संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे.
त्यामुळे प्रतापगडनंतर इतर गड आणि किल्ल्यावरींल अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही प्रशासनाला आदेश देत आहोत.
तसेच आगामी काळात सर्व गड आणि किल्ले स्वच्छ करण्यासाठी देखील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

 

Web Title :- Uday Samant | The action that has been taken against Jitendra Awada has been done according to the law

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Mahesh Tapase | “बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी…”; राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांचा टोला

Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

Sudhir Mungantiwar | काँग्रेसची भूमिका नेहमीच शिवाजी आणि हिंदू देवतांच्या विरोधात राहिली आहे – सुधीर मुनगंटीवार