Uday Samant | कोकण रिफायनरी प्रकल्पाला कोयना धरणातील पाणी – उदय सामंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वादादीत कोकण रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारने पावले उचलने सुरु केले आहे. कोकण रिफायनरी प्रकल्पाला कोयना धरणाचे पाणी वापरण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. तसेच हा प्रकल्प शेतकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात येणार असल्याचे देखील उदय सामंत (Uday Samant) यावेळी म्हणाले.

 

बारसू येथे हा रिफायनरी प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पासाठी अर्जुना धरणातील पाणी न वापरता कोयना धरणातील पाणी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोयना धरणापासून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. आज उद्योग मंत्र्यांनी याबाबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सामंत (Uday Samant) म्हणाले, रिफायनरी कशाप्रकारे होणार आहे, याची माहिती देण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती. रिफायनरीसाठी 6,200 एकर जागा आवश्यक आहे. त्यापैकी 2900 एकर जमीन मालकांनी संमती पत्रे दिली आहेत. उर्वरित जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून, आम्ही लवकरच उर्वरीत जागा देखील ताब्यात घेऊ. या प्रकल्पासाठी नाटेसाखरमध्ये क्रूड ऑईलचा साठा होणार आहे. हा प्रकल्प राज्यात दोन लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक देणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष 3000 आणि अप्रत्यक्ष 75000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे आता कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य सरकारने एक प्रकारचा कृती आराखडाच तयार केला आहे.
त्यात सर्व गोष्टींची सर्वांशी चर्चा करुन काळजीपूर्वक मांडणी करण्यात आली आहे.
अर्जुना धरणातून पाणी घेतल्यास कोकणाला पाणी टंचाई होईल, अशी काहींची तक्रार होती.
त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पाला शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे समर्थन आहे.
पण दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीला दांडी मारली.
त्यामुळे शिवसेनेत रिफायनरीवरुन मतभेद असल्याचे दिसले.

 

Web Title :- Uday Samant | Water from Koyna Dam to Konkan Refinery Project – Uday Samant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत