… तर ‘यांना’ मुख्यमंत्री करा : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार कोणतंही असलं तरी शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचली तरी फार उशिरा पोहचते. यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा योजना लागू करावी, अन्यथा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असलेल्या सत्ता संर्घषावरही त्यांनी मिश्किल टिपणी केली आहे. रामदास आठवले यांच्या मागणीप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री करा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.
Image result for ramdas
सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा, असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी युतीला दिला आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याच्या मागणीविषयी बोलताना म्हणाले, सर्वजण जवळचे आणि तज्ज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचं नाव घेणार, त्यापेक्षा चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणूकीनंतर आता शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन चढाओढ सुरु आहे. इतके दिवस होऊनही भाजप-शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश येत नाही. यावरुन विरोधी पक्षाकडून रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा अशी टिपणी करण्यात आली होती. त्यावर रामदास आठवलेंनी मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास मी चांगलं काम करेन असं म्हटलं होतं.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या