…म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो : खा. उदयनराजे भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं योग्य नाही, असं मत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. पुण्यातील कात्रज परिसरात ‘शिवसृष्टी’ होत आहे.

शिवसृष्टीचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी तेथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. या शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे. पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं योग्य नाही. जेम्स लेनला शिक्षा झाली पाहिजे. राज्य सरकार बांधणार असलेल्या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलं माहिती नाही, पण शिवस्मारक झालं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी नमूद केले.