खासदार उदयनराजे घेणार शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीतुन भाजप पक्षात प्रवेश केलेले सातारचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले तब्बल काही वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. नवी दिल्लीत ही भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी दिल्लीत भेट घेतली होती. यावळी उदयनराजेंनी नाना पटोले यांचं अभिनंदन केलं होतं. पण, उदयनराजे आणि नाना पटोले यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. तसेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला उदयनराजे पोहोचणार आहेत.

दरम्यान, त्यानंतर आता पहिल्यांदाच उदयनराजे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ते भेट घेणार असल्याचे समजते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.