उदयनराजेंचा मोठा गौप्यस्फोट ; वाढदिवसी आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो ‘कट’…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणुक होत आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून येथील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ज्यांनी आमच्या छातीचा कोट केला होता असे विधान केले होते. त्यावर उत्तर देताना छातीचा कोट केला म्हणणाऱ्यांना आता जनतेकडून कडेलोट होणार असल्याची कुणकुण लागली आहे, अशा शब्दात उदयनराजे यांनी उत्तर दिले आहे.


उदयनराजे म्हणाले की, राजकारण-समाजकारण सोडा परंतु जेव्हा आमचा वाढदिवसाचा सर्वपक्षीय कार्य़क्रम असतानाही ज्यांनी कट करुन, आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट सामान्य जिल्हावासियांनी हाणून पाडला होता. त्यामुळे जिल्हावासियांनी केलेल्या छातीच्या कोटाचे त्यांना निश्चित आश्चर्य़ वाटणारच असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

छातीचा कोट करणारे, आपले आई-वडील, जिवाभावाचे मित्र, देशासाठी आपले जवान छातीचा कोट करून देशभुमी आणि देशवासियांचे रक्षण करीत असतात. आमच्यासाठी आई- विडलांसह सातारा जिल्हा वासियांनी छातीचा कोट करूनच आजपर्य़त साथ दिली. आश्चर्य़ व्यक्त करणारे आमचे मित्र होते आजही असले तरी मागील वर्षीच्या आमच्या राजकारण विरहित व्यक्तिगत वाढदिवसाच्या सर्वपक्षीय क्रार्यक्रमावेळी संगनमताने दडून बसले नसले असा टोला उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला.

Visit : Policenama.com