उदयनराजे यांना ‘या’ दोन पक्षांकडून लोकसभेसाठी आॅफर

मुंबई: पोलीसनामा आॅनलाईन

उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेसाठी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या एका गटाकडून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले व नितेश राणे यांनी उदयनराजेंसमोर एक नवा प्रस्ताव मांडला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने उदयनराजेंना तिकीट नाकारल्यास त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22745a21-cb21-11e8-911c-75007ed73d97′]
तर उदयनराजे एक ताकदवान नेते आहेत. आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. त्यांचेही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत आहे, असे ट्विट करत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही उदयनराजेंना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता उदयनराजे काय पाऊल उचलणार, याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी रविवारी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27a51698-cb21-11e8-a993-8b39a3a82779′]

या बैठकीनंतर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहोत. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

चिखली पोलीस ठाण्यात ८ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या