महाराष्ट्रात तीन चतुर्थांश जागा मिळणार, अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजपामध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनसंघ, भारतीय जनता पार्टीचे काम करीत असतानाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत आलो आहे. आज थेट या परिवारातील वंशज उदयनराजे हे भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. याचा आनंद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती तीन चतुर्थांश जागा मिळवेल, असा दावा भाजपाचे राष्ट्रीय अमित शाह यांनी केला आहे.

नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा शनिवारी सकाळी भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, मी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षे चांगले काम केले आहे. महाराष्ट्राचा मुड पाहता युती तीन चतुर्थांश जागा मिळवेल.

यावेळी उदयनराजे म्हणाले की, निवडणुका आल्यानंतर शेवटच्या तीन महिन्यात कोणीही राजीनामा देतं, पण निवडून आल्यानंतर ३ महिन्यात राजीनामा देणारा देशातील मी पहिला खासदार आहे. काश्मीरचे ३७० कलम रद्द करुन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे देश मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला अधिक मजूबत करण्याचे काम करण्यासाठी भाजपात प्रवेश करीत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, उदयनराजे हे १९९५ मध्ये युतीसोबत होते. त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात केवळ शरिराने होते. मनाने भाजपामध्येच होते.

मध्यरात्री दिला राजीनामा –
उदयनराजे यांनी भाजपा प्रवेशासाठी दोन अटी घातल्या होत्या. राजीनामा दिल्यानंतर विधानसभेबरोबर पोटनिवडणुक घ्यावी. निवडणुकीत दगाफटका झाला तर राज्यसभेवर घ्यावे, अशा दोन अटी राजेंनी भाजपापुढे ठेवल्या होत्या. या अटींमुळे उदयनराजे यांचा भाजपा प्रवेश रखडला होता. भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या अटी मान्य केल्यानंतर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री हे उदयनराजे यांना घेऊन दिल्लीला गेले. मध्यरात्री दीड वाजता त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनी तो मध्यरात्री तातडीने मंजूर केला. त्यानंतर त्यांनी आज सकाळी भाजपामध्ये प्रवेश केला.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या