मराठा आरक्षणासाठी पहिल्यापासून लीड घेतलं पण, आता गळ्याशी आलयं : खा. उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –   मराठा आरक्षणासंदर्भात पहिल्यापासून लीड घेतल पण आता गळ्याशी आल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी (दि. 19) साता-यात बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत मराठा नेत्यांची बैठक घेणार आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अशोक चव्हाण, शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या नियोजनासाठी उदयनराजेंनी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत सर्वांसमोर मराठा आरक्षणासंदर्भात कोणी राजकारण केले किंवा होऊ नये यासाठी व्हाईट पेपर पब्लिश करावा, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, उदयनराजे यांनी नुकतीच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत चर्चा झाली होती.