Udayanraje Bhonsle | खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Udayanraje Bhonsle | भाजपचे (BJP) खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट सातारा (Satara) जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीवेळी मराठा आरक्षणाबाबतही (Maratha reservation) चर्चा झाली. मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे याबाबत देखील चर्चा करण्यात आली. परंतु उदयनराजे स्वत: साताऱ्यातून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी जाऊन भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले.
कोयना धरणातील (Koyna Dam) जलाशयातून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजे यांनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घतले होते.
यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजे यांनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केली, याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिला आहे.

Web Titel :- Udayanraje Bhonsle | mp udayanraje bhonsle and minister eknath shinde meet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट ! महागाई भत्ता, DR यामुळे ‘घरभाडे’ भत्त्यात वाढ

SBI नं जिंकलं कोटयावधी ग्राहकांचं मन, कर्जाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Covid 19 Drugs | नव्या औषधानं फक्त 5 दिवसात कोरोना रुग्ण होणार ठणठणीत – सीडीआरआयचा दावा