खा. उदयनराजे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास चर्चा, पण…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर आजदेखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मेगाभरती होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र अनेक दिवसांपासून  चर्चा सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे  भोसले मात्र आज भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची माहिती आहे.

या प्रकरणी काल उदयनराजे भोसलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दीड तास चर्चा देखील केली. मात्र याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसून यामध्ये प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उदयनराजेंच्या अनेक मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी पुण्यात आपल्या समर्थकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे उदयनराजे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या कारणामुळे उदयनराजे टाळू शकतात भाजप प्रवेश
जर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकाच वेळी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे ते सध्या प्रवेश करण्याचा विचार करत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता त्यांची मागणी मान्य होते कि नाही, हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मात्र आज रात्रीपर्यंत उदयनराजे आपला निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.