‘या’ कारणामुळं उदयनराजेंचा भाजप प्रवेश थांबला, राष्ट्रवादीतही ‘धाकधूक’ सुरूच

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. मात्र उदयनराजे यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट विधान केले नव्हते. रविवारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद साधला. यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

‘या’ कारणामुळे उदयनराजे पक्षांतर करण्याबाबत विचारू करू शकतात –

उदयनराजे भोसले यांना अवघा महाराष्ट्र ओळखत असला तरी या दिग्गज व्यक्तिमत्वाला एकदा निवडणुकीच्या रिंगणात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे स्वतःच्या करिष्म्यासोबत पक्षाची ताकद असणं महत्वाचं ठरणार आहे. साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे जाळे खूप मोठे आहे ज्यात राष्ट्रवादीचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. ‘या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको’, असा सूचक इशारा उदयनराजेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिला होता.

राष्ट्रवादी सोडल्यास लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागेल ज्यात उदयनराजेंना मोठ्या ताकदीची गरज असेल मात्र राष्ट्रवादीपेक्षा इतर पक्षाची साताऱ्यात अद्याप तरी मोठी ताकद निर्माण झालेली नाही त्यामुळे पुन्हा निवडणूक झाली तर विजयी निकालाची खात्री येणे थोडे अवघड आहे.

या सगळ्या कारणांमुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र जर याउलट झालं तर राष्ट्रवादीसाठी ती मोठी अडचणही ठरू शकते म्हणजे जर उदयनराजे भाजपात गेले तर अनेक कार्यकर्तेही भाजपात जातील आणि राष्ट्रवादीची ताकद कमी होईल यामुळे उदयनराजेंनी अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. राष्ट्रवादीसोबत उदयनराजे सुद्धा पक्षांतराबाबत सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –