साताऱ्याच्या दोन्ही राजांचे मनोमिलन ; शरद पवार ठरले दोघांमधील दुआ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यासोबतच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद लोकांना नवे नाही. मात्र आज साताऱ्यातील खासगी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली. तेव्हा सर्वांना चकित करणारे दृश्य यावेळी पहावयास मिळाले. शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांना एकाच गाडीत घेतले. यावेळचे विशेष म्हणजे चक्क शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंची गाडी चालवली. सातारकरांसाठी हे दृश्य दुर्मिळच होते.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. साताऱ्यातील या दोन्ही राजांचे पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याच दिसत आहे. या मनोमिलनाचे निमित्त शरद पवार ठरले आहेत. एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही युती करण्याचे काम केले.

काही दिवसांपासून उदयनराजे राष्ट्रवादीसोबत नाहीत अशी चर्चा रंगत होती. मात्र उदयनराजेंनी शरद पवारांच्या गाडीतून एन्ट्री घेतल्याने उदयनराजे राष्ट्रवादीसोबतच आहेत, असं चित्र दिसून आलं. तसंच उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, आणि शिंदे हे पवार यांच्यासोबत एकाच गाडीत दिसले. विशेष म्हणजे यावेळी उदयनराजेंची गाडी चालवण्याचे काम चक्क शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. या दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा प्रवासाचा व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतं आहे.

दरम्यान, साताऱ्यात राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना खासदारकीसाठी उमेदवारी मिळेल का यावर शंका व्यक्त होत होती. मात्र आता उदयनराजेच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच उदयनराजेंना उमेदवारी मिळण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.

Loading...
You might also like