राष्ट्रवादी काँग्रेस सातारा पालिका निवडणूक लढविणार : आमदार शशिकांत शिंदे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेस सातारा पालिका निवडणूक लढविणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरू द्या, हा त्यांचा प्रश्न आहे. आरक्षणापुढे हा प्रश्न किरकोळ असल्याचे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले आहे.

‘जलमंदिर पॅलेस’ येथे छत्रपती उदयनराजे भोसले आणि मराठा महासंघाचे शशिकांत पवार यांच्यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यानंतर वार्ताहरांना बोलताना छत्रपती उदयनराजे म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे हे उत्कृष्ट संसदपटू आहेत. मराठा आरक्षण हा प्रश्न राज्य सरकारचा आहे. तो त्यांनीच सोडवला पाहिजे. स्वतः करायचे नाही आणि विरोधाच्या भूमिकेत राहायचे आणि करू द्यायचे नाही हे चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पुढे सातारा पालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यावर वार्ताहरांनी विचारले असता, छत्रपती उदयनराजे म्हणाले, कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरू द्या, हा त्यांचा प्रश्न आहे.

You might also like