Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात भाजपेतर पक्षांचे एकमत आहे. ते म्हणजे त्यांना पदावरून हटवा, तर भाजप नेते त्यांना पाठीशी घालत आहेत. पण, भाजपचा एकमेव नेता म्हणजे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मात्र पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्यापालांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे; अन्यथा आपण वेगळी भूमिका घेऊ किंवा तीव्र आंदोलन करू, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले आहेत.
शिवाजी महाराजांची बदनामी थांबवावी, नाहीतर मला वेगळा विचार करावा लागेल, असे भोसले म्हणाले आहेत. त्यांनी एकप्रकारे पक्षालाच आव्हान केले आहे. त्यामुळे ते भाजपसोबत फारकत घेणार का, या चर्चांना ऊत आला आहे. भोसले शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे मी उद्या रायगड किल्ल्यावर जाणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट करणार आहे, असे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले आहेत.

त्यामुळे शनिवारी भोसले रायगडावर मेळाव्याला संबोधीत केल्यानंतर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे. उदयनराजे भोसले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत.
प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे भोसलेंनी म्हटले आहे.
मला खात्री आहे की, राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय
सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा, असे भोसले म्हणाले आहेत.

Web Title :- Udyanraje Bhosale | BJP MP udyanraje bhosale criticize bhagatsinh koshayari over chatrapati shivaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narendra Patil | ‘शरद पवारांना जाणता राजा पदवी द्यायला ते कुठे लढायला गेले होते?’ मंगलप्रभात लोढा वक्तव्याप्रकरणी नरेंद्र पाटलांचा सवाल

INDW vs AUSW | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर