Udayanraje Bhosale | खा. उदयनराजे भाजपलाही नकोसे?; सातारा जिल्हाध्यक्षांच्या विधानामुळं चर्चेला उधाण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – काही वर्षापुर्वी राष्ट्रवादीला (NCP) सोडून भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलेले राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याबाबत एक आनोखीचं चर्चा सुरु आहे. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आता भाजपलाच नकोसे झाले असल्याची चर्चा आहे. नुकतंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजप जिल्हाध्यक्षांनी फलटण येथे केलेलं एक विधान चर्चेसाठी सामोरं आलं आहे.

 

काल (मंगळवारी) नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) साता-यात होते. तसेच फलटण तालुका संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठीही ते उपस्थित होते. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी साताऱ्याच्या भावी खासदाराबद्दल वक्तव्य केलं. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) हे आगामी वेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, असं ते म्हणाले, पावसकर यांनी केलेले हे वक्तव्य आता चर्चेला जोर धरत आहे.

 

 

दरम्यान, सध्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा साता-यात दबदबा आहे.
त्यांना मानणारा मोठा वर्ग याच जिल्ह्यात आहे. भाजपात (BJP) प्रवेश केल्यावर त्यांनी प्रथम या पक्षातून लोकसभा लढवली.
मात्र त्यांचा त्यावेळी पराभव झाला. असं असलं तरी त्यांचा लोकांशी थेट संपर्क आहे.
दरम्यान, सध्या ते भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. मात्र, लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविणार नाही असं भाष्य त्यांनी कधीही केलं नाही.
परंतु विक्रम पावसकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पावसकर हे चुकून तसं बोलून गेले की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच सांगावा आला, याबाबत जिल्ह्यात तर्क वितर्कांना वेगळीच पालवी फुटली आहे.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | bjp keeping distance with udayanraje bhosale Satara district president’s statement sparked discussion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा