Udayanraje Bhosale | ‘छत्रपती शिवाजी महारांजांचे गुरू रामदास स्वामी नव्हते, त्यांचे गुरू…’; उदयनराजेंनी सांगितला खरा इतिहास!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Udayanraje Bhosale | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू रामदास स्वामी असल्याचं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात केलं. याच पार्श्वभूमीवर  भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास (Ramdas Swami) हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असल्याचं उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

 

खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते.
त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत.
तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, अशी मागणीही उदयनराजे यांनी केली आहे.
त्यासोबतच राजकीय वर्तुळातूनही राज्यपालांवर निशाणा साधला जात आहे.

खरा इतिहास (True History) माहित करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी ? –
महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल ?,
मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.
प्रत्येकाच्या मागे आईचं (Mother) मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं,
असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | BJP mp udayanraje bhosale slams bhagat singh koshyari for remark on chhatrapati shivaji maharaj

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा