Udayanraje Bhosale | ‘त्याचा अर्थ भाजपने त्यांना’ ! महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत उदयनराजे म्हणाले…

दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या विरोधी विधानामुळे शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी कठोर भूमिका घेतली होती. पुण्यात एका पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने उदयनराजे भोसले दिल्ली आहेत. त्यांनी यासंबंधी नरेंद्र मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट झाली नाही. तरी, त्यांनी (Udayanraje Bhosale) यासंबंधी पंतप्रधान कार्यालयात पत्र दिले असून, ते पुन्हा यासंबंधी पत्रकारांशी बोलत होते.

 

त्यांना महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबरच्या मोर्चाबाबत यावेळी विचारणा करण्यात आली. तेव्हा उदयनराजे भोसले म्हणाले, “कोणत्याही आघाडीचा किंवा पक्षाचा हा प्रश्न नाही. या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता नाही. पण सर्व शिवप्रेमी नाराज आहेत, हे नक्की आहे. जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष केलं तर फरक पडत नाही, असं चित्र निर्माण होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे सतत घडत राहिलं तर चांगलं नाही”. तसेच, राज्यपाल हे छोटे पद नाही. पण लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे, असेही उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) सांगितले.

भोसलेंना उद्धव ठाकरे राज्यपालांच्या विधानावर राजकारण करून भावना भडकवत आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “राजकारण होत आहे असं म्हणता येणार नाही.
जे सत्तेत असतात, तेच राज्यपालांची नेमणूक करतात. पण त्याचा अर्थ भाजपने त्यांना असं बोला म्हणून सांगितलं,
असा होत नाही. त्या वक्तव्यासाठी संपूर्ण पक्षाला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही.
पण चूक झाली असेल तर कारवाई झाली पाहिजे”.
शिवाय, घडलेल्या प्रकाराबाबत राज्यापालांनी माफी न मागितल्याची खंत त्यांना आहे, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | bjp udayanraje bhosle on maharashtra governor bhagat singh koshyari shivsena uddhav thackeray chhatrapati shivaji maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज